News Flash

सेलिब्रिटी कट्टा : कोहलीकडून खूप अपेक्षा!

मी क्रिकेटवेडी नसले तरी क्रिकेटची निस्सीम चाहती आहे

(संग्रहित छायाचित्र)

अश्विनी कासार

मी क्रिकेटवेडी नसले तरी क्रिकेटची निस्सीम चाहती आहे. आपल्याकडे लोक सणासमारंभांना एकत्र येत नाहीत, एवढे क्रिकेट पाहण्यासाठी एकत्र येतात. एकत्र क्रिकेट पाहणे हा एक सोहळा असतो. मी लहान असताना भारताच्या विजयानंतर घरात जल्लोष असायचा आणि आयस्क्रीम पार्टी केली जायची. आजही आमच्याकडे एकत्र येऊन क्रिकेटचे सामने पाहिले जातात. विशेष म्हणजे, लोक रस्त्यावर थांबून, गाडय़ा थांबवून एकमेकांना स्कोअर विचारतात. क्रिकेटसाठी अनोळखी माणसांसोबतही संवाद साधतात आणि हीच क्रिकेटची खरी ताकद आहे, असे मला वाटते. सध्या विश्वचषकाच्या निमित्ताने सगळीकडे क्रिकेटचा माहोल आहे आणि हा माहोल आमच्या सेटवरसुद्धा सुरू आहे. वेळ मिळेल तसे सगळे क्रिकेट खेळत असतात. मग सेटच्या कोपऱ्याला चौकार, बाजूला षटकार, इकडे बाद, तिकडे टप्पा अशी सगळी धम्माल सुरू असते. माझा आवडता खेळाडू आणि सध्याचा समाजमाध्यमांचा कल पाहता, यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीकडून देशाला खूप अपेक्षा आहेत.

(शब्दांकन : भक्ती परब)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2019 1:16 am

Web Title: high expectations from kohli says ashwani kaasar
Next Stories
1 ड्रोनच्या नजरेतून : र ण नी ती का र !
2 थेट इंग्लंडमधून : आवाज कुणाचा?.. भारतीय चाहत्यांचा!
3 विजय सातत्याचे ध्येय!
Just Now!
X