02 March 2021

News Flash

फिंचला चेंडू लागल्यानंतर राहुलनं केली मस्करी, पाहा व्हिडीओ

भारतापुढे ३९० धावांचं आवाहन

दुसऱ्या एकदिवसीय सामन्या ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ३८९ धावांचा डोंगर उभा केला आहे. स्मिथनं पुन्हा एकदा शतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली आहे. स्मिथशिवय कर्णधार फिंचने ६९ चेंडूत ६० धावांची संयमी खेळी केली.  संयमी खेळीदरम्यान नवदीप सैनीचा एक फुलटॉस चेंडू फिंचच्या थेट पोटावर येऊन आदळला. थोडावेळ खेळ थांबला असता यष्टीमागे उभा असलेला शांत स्वभावाचा राहुल फिंचकडे गेला. राहुलनं यावेळी चेंडू लागलेल्या ठिकाणी मस्करी करण्याचा प्रयत्न केला. जास्त चेंडू लागला नाही ना? असं म्हणत राहुलनं फिंचची मस्करी केली. यावेळी फिंचने राहुलचा हात बाजूला करत हसत हसत त्याला उत्तर दिलं. यावेळी जवळ उभे असलेले वॉर्नर आणि चहलही हसत होते.

 

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

मैदानावर घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्रीडा चाहले हा व्हिडीओ पाहून म्हणत आहेत की, स्लेजिंगऐवजी मस्करी कधीही चांगली.. या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 1:45 pm

Web Title: hilarious kl rahul checks on aaron finch after brutal delivery from navdeep saini watch nck 90
Next Stories
1 Ind vs Aus : स्टिव्ह स्मिथकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई, अनोखी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू
2 स्मिथनं पुन्हा धुतलं, झळकावलं दुसरं शतक
3 रसेलचं तुफान! १९ चेंडूत चोपल्या ६५ धावा
Just Now!
X