20 February 2019

News Flash

IAAF World U20 Championship : धावपटू हिमा दासने रचला इतिहास, भारताला पहिल्यांदाच जिंकून दिले सुवर्ण

ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली आहे.

भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. IAAF वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने ४०० मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली आहे. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत पहिली जागा मिळवली.

हिमाने बुधवारी उपांत्य फेरीत देखील ५२.१० सेकंदात पहिला क्रमांक पटकावला होता. पहिल्या राऊंडमध्ये देखील तिने ५२.२५ सेकंदाचा विक्रम केला होता. आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये भारतीय अंडर २०मध्ये ५१.३२ सेकंदात रेस पार करीत सहाव्या स्थानावर राहिली होती. त्यानंतर सातत्याने तिने आपली वेळ सुधारली. नुकतेच तिने आंतरराज्यीय चॅम्पिअनशीपमध्येदेखील सुवर्णपदक जिंकले होते. या इव्हेंटमध्ये तिने ५१.१३ सेकंदाचा वेळ घेतला होता.

आजच्या ऐतिहासिक विजयानंतर हिमा दास आता स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोपडाच्या क्लबमध्ये सामिल झाली आहे. नीरजने २०१६मध्ये जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, हिमा ही ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय अॅथलेट ठरली आहे.
वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअनशीपमध्ये यापूर्वी भारतासाठी सीमा पूनिया २००२मधील डिस्कस थ्रोमध्ये कांस्य आणि नवजीतकौर ढिल्लनने २०१४मध्ये ब्रॉन्झ पदक जिंकले होते.

First Published on July 13, 2018 1:18 am

Web Title: hima das creates history wins gold at junior athletics worlds