News Flash

हिमाची आणखी एक सुवर्ण कामगिरी ; १५ दिवसात जिंकले चौथे सुवर्ण पदक

पुरुषांच्या ४०० मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसचेही दुसरे सुवर्ण पदक

हिमाची आणखी एक सुवर्ण कामगिरी ; १५ दिवसात जिंकले चौथे सुवर्ण पदक

भारतीय वेगवान धावपटू हिमा दासची दमदार कामगिरी सुरूच आहे. सलग १५ दिवसांच्या आत हिमाने धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये चौथे सुवर्णपदक जिंकत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या टॅबर ऍथलेटिक्स मीटवर हिमा दास ने हा पराक्रम केला आहे. तसेच पुरुषांच्या ४०० मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने आपले दुसरे सुवर्ण पदक मिळवले आहे.

हिमा ने केवळ २३.२५ सेकंदात २०० मीटर अंतर पार करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. याआधी १९ वर्षांच्या हिमाने २, ६ आणि १४ जुलै रोजीही तीन सुवर्णपदक जिंकले होते. हिमा ने स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

 

दरम्यान, हिमाने आसाममधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने मदतीचा हात पुढे केला आहे. तिने तिच्या महिन्याच्या वेतनातील अर्धे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहे. याशिवाय हिमाने इतर नागरिकांना देखील आसाम पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 12:27 am

Web Title: hima das wins her fourth gold medal in 15 days abn 97
Next Stories
1 विराट वेस्ट इंडीजच्या संपूर्ण दौऱ्यावर जाणार
2 ‘हे’ त्रिमूर्ती निवडणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक
3 विंडिज दौऱ्यात या युवा खेळाडूंना मिळणार संधी?
Just Now!
X