कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या पार्थिवावर पुनवत (ता. शिराळा) या जन्मगावी शोकाकुल वातावरणात सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर आणि सांगली जिल्हय़ासह देशभरातील कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

आंदळकर यांचे रविवारी निधन झाले. सोमवारी दुपारी त्यांचे पार्थिव प्रथम कर्मभूमी कोल्हापूर येथे आणण्यात आले. इथे मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर पार्थिव पुनवत (ता. शिराळा) या आंदळकर यांच्या जन्मगावी नेण्यात आले. गावातील निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दर्शनासाठी हजारोंचा जनसमुदाय उसळला होता. कुस्ती, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

आंदळकर यांच्या निधनामुळे पुनवतसह परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली होती. शाळा, विद्यालये बंद ठेवण्यात आली होती. गणेशोत्सवाचे सर्व

कार्यक्रम रद्द करण्यात आले. अंत्यदर्शनानंतर गावातून सजवलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, अमरसिंह नाईक, तहसीलदार शीतलकुमार यादव, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, अर्जुन पुरस्कार काका पवार, नामदेवराव भोसले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते

राम सारंग, भीमराव माने, सम्राट महाडिक आदींसह सांगली, सोलापूर, सातारा जिल्हय़ातील कुस्तीगीर उपस्थित होते. आंदळकर यांचा मुलगा अभिजित आंदळकर यांनी त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला.

कोल्हापुरात श्रद्धांजली!

हिंदकेसरी आंदळकर यांची कर्मभूमी असलेल्या करवीरनगरीत पार्थिव दुपारी एक वाजता आले. प्रारंभी, ‘न्यू पॅलेस’ परिसरातील त्यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर न्यू मोतीबाग तालमीच्या आखाडय़ात पार्थिव ठेवण्यात आले. पार्थिव येताच अनेकांना शोक अनावर झाला. यामध्ये मल्लांची संख्या मोठी होती. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी न्यू मोतीबाग तालमीकडे राज्यभरातून कुस्तीप्रेमी, मल्ल यांचा ओघ लागला होता. ‘अमर रहे, अमर रहे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर अमर रहे’ अशा घोषणा देत फुलांनी सजवलेल्या वाहनातून कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढली. या वेळी त्यांच्या पार्थिवावर मल्लांकडून फुलांचा वर्षांव केला जात होता.