हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात हृदयविकाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना पुण्यातील जोशी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा अभिजित, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी कोल्हापूर येथील पुनवत (ता. शिराळा) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. आंदळकर यांच्या निधनामुळे देशभरातील कुस्तीक्षेत्रात शोककळा पसरली आहे. आंदळकर यांच्या जाण्यामुळे कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून कुस्तीतला देव गेल्याची भावना ज्येष्ठ कुस्तीपटू काका पवार यांनी व्यक्त केली.


गणपतरावांची उल्लेखनीय कारकीर्द

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
dhairyasheel mohite patil latest marathi news
माढ्यात मोहिते – पाटलांचा प्रचार जानकर करणार, अखेर जानकर आणि मोहिते – पाटलांचा संघर्ष संपला
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!

 

दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर हे त्यांना वस्ताद म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती करू लागले. त्याचमुळे कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचा शाहू पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा अर्जुन पुरस्कारापेक्षा अधिक आनंद झाल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. १९६४ साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. आंदळकरांच्या उमेदीचा काळ हे कुस्तीचे सुवर्णयुग होते. कुस्तीला प्रतिष्ठा होती आणि मल्लांना ग्लॅमर होते. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले होते, ते कोल्हापुरात सराव करूनच.

आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलि​पिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते. कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात.

गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही. १९६७ पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले. त्यात महान भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जो​शीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद​ विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ही मल्लांची नामावलीवरून त्यांच्या वस्तादगिरीची कल्पना येऊ शकते.