01 December 2020

News Flash

‘हिंदकेसरी’चे पहिले मानकरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली

खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू

(संग्रहित छायाचित्र)

भारतातील हिंदकेसरी किताबाचे पहिले मानकरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमाभागातील चिकोडी तालुक्यातील एकसंबा हे खंचनाळे यांचे मूळ गाव. मात्र ते अनेक वर्षांपासून कोल्हापुरातच राहतात. त्यांनी १९५९ साली झालेल्या पहिल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवून कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रात मानाचा शिरपेच खोवला होता. त्यानंतरही त्यांनी अनेक मल्लांना धूळ चारली होती. अलीकडे ते नवोदित मल्लांना धडे देत होते. ८६ वर्षीय खंचनाळे यांची प्रकृती चिंताजनक बनली असून उपचारास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

पालकमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली

दरम्यान, हिंदकेसरी खंचनाळे यांची प्रकृती खालावल्याचे समजल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. देशातील कुस्तीगिरांना प्रेरणा आणि आदर्श असणारे खंचनाळे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच त्यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असल्याचे मंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:13 am

Web Title: hindkesari first honorary shripati khanchanale health deteriorated abn 97
Next Stories
1 खाशाबा यांच्या मरणोत्तर ‘पद्मश्री’साठी पाठपुरावा!
2 सेरी-ए फुटबॉल : रोनाल्डो युव्हेंटसच्या विजयाचा शिल्पकार
3 भारतीय अ‍ॅथलेटिक्सचे उच्च कामगिरी संचालक हेरमॅन यांचा राजीनामा
Just Now!
X