28 November 2020

News Flash

स्टार क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी; गृह मंत्रालायने पुरवली सुरक्षा

वाचा नक्की काय आहे प्रकरण...

कोलकाता येथील काली मातेच्या पूजेच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावल्याने एका मुस्लीम क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकीब अल हसन याने कोलकातामधील काली पूजेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याचा समज झाल्याने त्याला थेट ठार मारण्याची धमकी देण्यात आली. रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सिल्हेटचा रहिवासी असलेल्या मोहसीन तालुकदार याने शाकिबला ठार मारण्याची धमकी दिली. काली पूजेला हजेरी लावत शाकिबने मुस्लीम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप त्याने केला. त्यानंतर मंगळवारी धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली. तसेच, मुस्लीमांच्या भावना दुखावल्याबद्दल शाकिबनेदेखील जाहीर माफी मागितली. परंतु, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून शाकिबला बांगलादेशच्या गृह मंत्रालयाकडून सशस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, शाकिबने हिंदू देवतेच्या पुजेच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक मुस्लीम नेटिझन्सने त्याच्यावर सडकून टीका केली. त्यामुळे अखेर बांगलादेश क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी संबंधित सुरक्षा विभागाला या प्रकरणाबद्दल कल्पना दिली. त्यानंतर BCBच्या मागणीनुसार शाकिबला सुरक्षा पुरवण्यात आली. एका वृत्तानुसार सराव सत्रादरम्यान शाकिब सशस्त्र सुरक्षारक्षकांसमवेत मैदानावर असल्याचे दिसून आले. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री असदुझ्झमान यांनी दिली.

दरम्यान, शाकिबने काली पूजेसाठी हजेरी लावून मुस्लीमांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्याबद्दल बोलताना शाकिब म्हणाला, “मी पूजेच्या कार्यक्रमासाठी केवळ २ मिनिटं व्यासपीठावर होतो. लोकांचा असा समज झाला की मी त्या पूजेच्या कार्यक्रमाचे उद्धाटन केले. पण मी असं काहीही केलेलं नाही. मी मुस्लीम आहे त्यामुळे अशाप्रकारची कृती नक्कीच करणार नाही. मी तिथे जायलाच नको होतं. झालेल्या गैरसमजाबद्दल मला माफ करा. मी नेहमी इस्लाम धर्माचं पालन केलं आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो”, असं शाकिबने ऑनलाइन फोरमशी बोलताना स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 11:18 am

Web Title: hindu muslim controversy star cricketer shakib al hasan gets armed security by home ministry after death threats over kali puja vjb 91
Next Stories
1 कोहलीच्या अनुपस्थितीत या तीन खेळाडूंना ‘विराट’ कतृत्व दाखवण्याची सुवर्णसंधी
2 विराटचा पेपर सोप्पा, ‘या’ भारतीय खेळाडूला बाद करण्याचं मोठं टेन्शन
3 बुमरा, शमी यांना विश्रांती?
Just Now!
X