युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या संघासाठी बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरकडे कर्णधारपद असलेल्या अमेरिकेच्या संघाला बुधवारी ICC कडून एकदिवसीय संघाचा दर्जा प्रदान करण्यात आला. नामिबिया मध्ये WCL डिव्हिजन २ स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेतील सामन्यात हाँगकाँगच्या संघाला ८४ धावांनी पराभूत केल्यानंतर अमेरिकेच्या संघाला एकदिवसीय दर्जा प्रदान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रथम फलंदाजी करत अमेरिकेच्या संघाने ८ बाद २८० धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर झेव्हियर मार्शल याने दमदार शतक ठोकले. १५४ चेंडूत त्याने १०० धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. याशिवाय स्टीव्हन टेलर याने ८८ धावांची खेळी केली. त्यानेही ७ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली. या दोघांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना फारशी छाप पाडली नाही. त्यामुळे अमेरिकेला ८ बाद २८० धावांपर्यंतच मजल मारता आली.

या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगला ८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा किंचित शाह याने सर्वाधिक ५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार लगावले. एजाज खान आणि एहसान खान या २ फलंदाजांनी ८ व्या विकेटसाठी नाबाद ६६ धावांची भागीदारी केली. पण हे दोघे मिळून हाँग काँगला केवळ ७ बाद १९६ धावांपर्यंत मजल मारून देऊ शकले. हा विजय खेळाडूंनी गाणे गात आनंद व्यक्त केला.

कर्णधार सौरभ नेत्रावळकर याने सामन्यात अतिशय टिच्चून मारा करत ५ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि १ बळी टिपला. त्याच्या नेतृत्वाच्या कौशल्यामुळे अमेरिकेला प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय संघाचा दर्जा मिळाला.

”आम्ही केलेल्या कामगिरीवर आम्हाला आभिमान आहे. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवला म्हणूनच आम्ही संघ म्हणून उत्तम कामगिरी करू शकलो”, असे मत सौरभने व्यक्त केले.

More Stories onआयसीसीICC
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical moment for usa as usa cricket team gets odi status in international cricket
First published on: 25-04-2019 at 14:35 IST