05 August 2020

News Flash

होबार्ट खुली टेनिस स्पर्धा : सानियाचे यशस्वी पुनरागमन

एप्रिल २०१८मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाने टेनिसमधून काही काळासाठी विश्रांती घेतली होती.

भारताच्या सानिया मिर्झाने होबार्ट आंतरराष्ट्रीय खुल्या टेनिस स्पर्धेत युक्रेनच्या नाडिया किचनॉकच्या साथीने महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठत आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये यशस्वी पुनरागमन केले आहे.

दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या सानियाने किचनॉकसह जॉर्जियाची ओक्साना कॅलश्निकोवा आणि जपानची मियू काटो या जोडीचा २-६, ७-६, १०-३ असा पराभव केला. पहिला सेट सानियाने किचनॉकसह गमावला पण दुसरा आणि तिसरा सेट जिंकतानाही सानियाला झुंज द्यावी लागली. १ तास ४१ मिनिटे ही लढत रंगली होती.

एप्रिल २०१८मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाने टेनिसमधून काही काळासाठी विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा तिने झोकात पुनरागमन केले आहे. ‘‘या आनंदाच्या क्षणाला माझे आईवडील आणि माझा छोटा मुलगा माझ्यासोबत आहेत. मला आतापर्यंत मिळालेल्या प्रेमासाठी मी या साऱ्या मंडळींची आभारी आहे,’’ असे सानियाने म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:42 am

Web Title: hobart open tennis tournament akp 94
Next Stories
1 बेंगळूरुला जाण्याचा निर्णय पूर्णपणे सायनाचा!
2 दडपणाखाली खेळणे हे अध्यक्षपदापेक्षा अवघड -गांगुली
3 राणी रामपालकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व
Just Now!
X