03 April 2020

News Flash

मँचेस्टर सिटीला पराभवाचा धक्का

टॉटनहॅम आणि चेल्सी यांनीही आपली कामगिरी उंचावत अनुक्रमे क्रीस्टल पॅलेस आणि वुल्व्हस या संघांचा धुव्वा उडवला.

(संग्रहित छायाचित्र)

इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग

गतविजेत्या मँचेस्टर सिटीला शनिवारी नॉर्विच सिटीकडून २-३ अशा धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमधील मँचेस्टर सिटीचा जानेवारी महिन्यानंतरचा हा पहिला पराभव ठरला. लिव्हरपूलने न्यूकॅसलचा ३-१ असा धुव्वा उडवत पाच गुणांच्या फरकाने अग्रस्थान काबीज केले आहे.

टॉटनहॅम आणि चेल्सी यांनीही आपली कामगिरी उंचावत अनुक्रमे क्रीस्टल पॅलेस आणि वुल्व्हस या संघांचा धुव्वा उडवला.

केनी मॅकलिन (१८व्या मिनिटाला) आणि टॉड कान्टवेल (२८व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे नॉर्विच सिटीने सुरुवातीलाच २-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. सर्जियो अ‍ॅग्युरोने पहिल्या सत्राच्या अखेरीस मँचेस्टर सिटीचे खाते खोलले. पण टीमू पुक्कीने (५०व्या मिनिटाला) त्याची परतफेड करत नॉर्विच सिटीला ३-१ असे आघाडीवर आणले. रॉड्रिगो याने ८८व्या मिनिटाला दुसरा गोल केला तरी त्यांना बरोबरी साधण्यात अपयश आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:58 am

Web Title: hock defeat to manchester city english premier football league abn 97
Next Stories
1 भारतीय कुस्तीपटूंची निराशा सुरूच
2 जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : कविंदर उपउपांत्यपूर्व फेरीत
3 ऑस्ट्रेलियाचा १३५ धावांनी पराभव, अॅशेस मालिका बरोबरीत
Just Now!
X