28 नोव्हेंबरपासून ओडीशातील भुवनेश्वर येथे सुरु होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी, हॉकी इंडियाने काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा केली. 18 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व हे मनप्रीत सिंहकडे सोपवण्यात आलेलं असून, या संघात अनुभवी ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह आणि आघाडीच्या फळीतला खेळाडू एस. व्ही. सुनिलला वगळण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय शिबीरात सरावादरम्यान सुनिलच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तर रुपिंदपालकडे यंदा निवड समितीने दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

विश्वचषकासाठी असा असेल भारतीय संघ –

गोलकिपर – पी. आर. श्रीजेश, क्रिशन बहादूर पाठक

बचावफळी – हरमनप्रीत सिंह, बिरेंद्र लाक्रा, वरुण कुमार, कोठाजीत सिंह, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास

मधली फळी – मनप्रीत सिंह (कर्णधार), चिंगलेन साना (उप-कर्णधार), निलकांत शर्मा, हार्दिक सिंह, सुमीत

आघाडीची फळी – आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, दिलप्रीत सिंह, ललित कुमार उपाध्याय, सिमरनजीत सिंह