हॉकी इंडियाने २७ व्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. ३ मार्चपासून मलेशियाच्या इपोह शहरात ही स्पर्धा रंगणार आहे. भारतासह या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, इंग्लंड, आयर्लंड आणि यजमान मलेशिया हे संघ सहभागी होणार आहेत.

अवश्य वाचा – मी संपलेलो नाही, माझ्यातला ‘सरदार’ अजुनही जागा – सरदार सिंह

या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत पुन्हा एकदा सरदार सिंहच्या हाती संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. भारताचा भरवशाचा ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह, गोलकिपर पी. आर. श्रीजेश यांनाही अझलन शहा चषकासाठी विश्रांती देण्यात आलेली आहे. याजागी निवड समितीने प्रदीप मोर, सुमीत कुमार आणि शैलेंद्र लाक्रा या नवोदीतांना संघात जागा दिली आहे. याचसोबत रमणदीप सिंहला भारतीय संघाचा उप-कर्णधार करण्यात आलं आहे.

“न्यूझीलंड दौऱ्याप्रमाणे अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेतली आम्ही प्रयोग करुन पाहणार आहोत. या कारणासाठी महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देऊन तरुण खेळाडूंना संघात जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या संघांविरुद्ध खेळताना तरुण खेळाडू कसा खेळ करतात हे यातून आम्हाला समजेल, आणि यातूनच महत्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघ उभा केला जाईल.” भारतीय संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी संघनिवडीवर आपली प्रतिक्रीया दिली.

अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी असा असेल भारतीय संघ –

गोलकिपर – सुरज करकेरा, क्रिशन पाठक

बचावफळी – अमित रोहीदास, वरुण कुमार, दिप्सन तिर्की, सुरेंदर कुमार, निलम संजीप सेझ, मनदीप मोर

मधली फळी – एस.के. उथप्पा, सरदार सिंह (कर्णधार), सुमीत, निलकांत शर्मा, सिमरनजीत सिंह

आघाडीची फळी – गुरजंत सिंह, रमणदीप सिंह (उप-कर्णधार), तलविंदर सिंह, सुमित कुमार (ज्युनिअर), शैलेंद्र लाक्रा