१७ जानेवारीपासून न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या चौरंगी मालिकेसाठी हॉकी इंडियाने आज २० जणांच्या संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारत यजमान न्यूझीलंडसह बेल्जियम आणि जपान यांच्याविरोधात खेळणार आहे. २०१७ प्रमाणेच या संघाचं नेतृत्व मनप्रीत सिंहकडे सोपवण्यात आलं असून चिंगलेनसाना भारतीय संघाचा उप-कर्णधार म्हणून कामगिरी पार पाडणार आहे.

तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला भारतीय संघाचा गोलकिपर पी. आर. श्रीजेशने संघात पुनरागमन केलं आहे. याचसोबत युवा विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या क्रिशन पाठकलाही संघात जागा मिळाली आहे. याव्यतिरीक्त २०१८ मधील व्यस्त वेळापत्रक पाहता हॉकी इंडियाने यंदाच्या संघात काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिलेली आहे. सुलतान जोहर चषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या विवेक प्रसाद आणि दिलप्रीत सिंह या दोन खेळाडूंनाही संघात जागा मिळाली आहे.

चौरंगी मालिकेसाठी असा असेल भारतीय हॉकी संघ –

गोलकिपर – पी. आर. श्रीजेश, क्रिशन बहादुर पाठक

बचावफळी – हरमनप्रीत सिंह, सुरेंदर कुमार, गुरिंदर सिंह, वरुण कुमार, रुपिंदरपाल सिंह, बिरेंद्र लाक्रा

मधली फळी – मनप्रीत सिंह (कर्णधार), चिंगलेनसाना सिंह (उप-कर्णधार), विवेक प्रसाद सागर, हरजीत सिंह, निलकांत शर्मा, सिमरनजीत सिंह, सतबीर सिंह

आघाडीची फळी – दिलप्रीत सिंह, रमणदीप सिंह, मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, अरमान कुरेशी