आगामी सुलतान अझलन शहा चषक हॉकी आणि राष्ट्रकुल स्पर्धांसाठी हॉकी इंडियाने सराव शिबिरासाठी ३३ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या चौरंगी मालिकेत भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी केली होती. यजमान न्यूझीलंड, बेल्जियम आणि जपानच्या संघाला भारतीय संघाने पराभवाचं पाणी पाजलं. आगामी स्पर्धांचा विचार केला असता, ‘साई’च्या बंगळुरु येथील केंद्रात हॉकी इंडियाचं सराव शिबिर पार पडणार आहे.

३ ते १० मार्च दरम्यान सुलतान अझलन शहा चषक हॉकी आणि तर ४ एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धांना सुरुवात होणार आहे.

राष्ट्रीय सराव शिबिरासाठी असा असेल भारतीय संघ –

गोलकिपर – आकाश चिकटे, सुरज करकेरा, पी. आर. श्रीजेश, क्रिशन पाठक

बचावफळी – हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, दिपसन तिर्की, वरुण कुमार, रुपिंदरपाल सिंह, बिरेंद्र लाक्रा, सुरेंद्र कुमार, गुरिंदर सिंह, निलम संजीप सेज, सरदार सिंह

मधली फळी – मनप्रीत सिंह, चिंगलेनसाना सिंह, एस.के. उथप्पा, सुमीत, कोठाजित सिंह, सतबीर सिंह, निलकांत शर्मा, सिमरनजीत सिंह, हरजीत सिंह

आघाडीची फळी – एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, ललित उपाध्याय, गुरजंत सिंह, रमणदीप सिंह, अरमान कुरेशी, अफ्फान युसूफ, तलविंदर सिंह, सुमित कुमार