सुलतान अझलन शहा आणि वर्ल्ड हॉकी लिग स्पर्धेतल्या निराशाजनक कामगिरीनंतर आगामी युरोप दौऱ्यासाठी भारतीय हॉकी संघात आता मोठे बदल घडताना दिसून येत आहेत. बेल्जियम आणि नेदरलँड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत संघातल्या सिनीअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे. भारताच्या ज्युनिअर विश्वचषक विजेच्या संघातील काही खेळाडूंना यंदा हॉकी इंडियाने भारताच्या मुख्य संघात खेळण्याची संधी दिलेली आहे.

मनप्रीत सिंहकडे संघाचं कर्णधारपद तर चिंगलीनसानाकडे संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. १८ जणांच्या या संघामध्ये युवा विश्वचषक विजेच्या सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. वरुण कुमार, दिपसन तिर्की, निलकांत शर्मा, गुरजंत सिंह आणि अरमान कुरेशी यांनी संघात पदार्पण केलं आहे. याव्यतिरीक्त २०१७ च्या हॉकीलीग स्पर्धेचा विजेता कलिंगा लान्सर्सचा बचावपटू अमित रोहीदास, यालाही संघात जागा मिळाली आहे.

Virender Sehwag Says Yuzvendra Chahal's brilliant bowling
IPL 2024 : वीरेंद्र सेहवागला राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला विश्वचषक खेळताना पाहायचंय; म्हणाला, “तो टी-२० क्रिकेटचा महान…”
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
Ambati Rayudu explains why RCB didn't win a IPL trophy for 16 years
आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’
Ruturaj Gaikwad has been fantastic as CSK captain so far says Hussey
IPL 2024 : गावस्कर यांच्यापाठोपाठ आता चेन्नईचे प्रशिक्षक हसीदेखील प्रभावित; ऋतुराज गायकवाड क्रिकेट जाणणारा माणूस

लागोपाठ दोन स्पर्धांमध्ये आलेल्या अपयशानंतर आगामी आशिया चषक, वर्ल्ड हॉकीलीग फायनल, आणि विश्वचषक स्पर्धांमध्ये संघात नवोदीत खेळाडूंना जागा मिळणार असल्याचं कळतंय. आगामी २०२० टोकीयो ऑलिम्पीकच्या आधी हॉकी इंडियाला भारतीय संघाची मजबूत बांधणी करायची आहे. यासाठी गेले काही सामने संघात चांगली कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत याआधीच हॉकी इंडियाने दिले होते. तसेच संघाचे प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठीही हॉकी इंडियाने एका समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालानंतर रोलंट ओल्टमन्स यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल.

९ आणि १० ऑगस्टरोजी भारत बेल्जियमविरुद्ध दोन सामने खेळणार आहे. त्यानंतर भारताचा सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे.

कसा असेल भारताचा १८ सदस्यीय संघ ?

गोलरक्षक –

आकाश चिकटे
सुरज कारकेरा

बचावपटू –

दिपसन तिर्की
कोठाजीत सिंह
गुरिंदर सिंह
अमित रोहीदास
वरुण कुमार

मधली फळी –

एस.के.उथप्पा
हरजीत सिंह
मनप्रीत सिंह ( कर्णधार )
चिंगलीनसाना सिंह ( उप-कर्णधार )
सुमीत
निलकांत शर्मा

आघाडीची फळी –

मनदीप सिंह
रमणदीप सिंह
ललित कुमार उपाध्याय
गुरजंत सिंह
अरमान कुरेशी