‘हॉकी इंडिया’ने करोनाच्या लढय़ासाठी अतिरिक्त ७५ लख रुपयांचा निधी उपलब्ध के ल्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान सहायता निधीत हॉकी इंडियाने एकूण एक कोटी रुपयांची मदत दिली आहे.

‘हॉकी इंडिया’ने याआधी १ एप्रिल रोजी २५ लाख रुपयांची मदत केली होती. मात्र हॉकी इंडियाच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकीत आणखी ७५ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारताचा गोल्फपटू अनिरबान लहिरी यानेही पंतप्रधान सहायता निधीला सात लाख रुपयांची मदत के ली आहे. ‘‘या कठीण काळात प्रत्येकाने पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. मी सात लाख रुपयांचा निधी पंतप्रधान सहायता निधीत जमा करत आहे. त्याचबरोबर झोमॅटो फीडिंग इंडिया मोहिमेअंतर्गत १०० कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे,’’ असे लहिरीने सांगितले.