04 March 2021

News Flash

स्कॉटलंड दौऱ्यासाठी कनिष्ठ महिला हॉकी संघ जाहीर

स्कॉटलंडच्या दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने १८ सदस्यीय कनिष्ठ महिला संघ जाहीर केला. २७ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत जर्मनीत होणाऱ्या कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषकाच्या दृष्टीने

| May 1, 2013 02:16 am

स्कॉटलंडच्या दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने १८ सदस्यीय कनिष्ठ महिला संघ जाहीर केला. २७ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत जर्मनीत होणाऱ्या कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषकाच्या दृष्टीने हा दौरा रंगीत तालीम आहे. हॉकी इंडियाचे निवड समिती बलबीर सिंग, सय्यद अली तसेच सरकारी निरीक्षक हरबिंदर सिंग यांनी संघाची निवड केली. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमध्ये झालेल्या निवड समिती चाचणीनंतर संघाची निवड करण्यात आली. या दौऱ्यात भारतीय संघ पाच सामने खेळणार आहे.  संघ : गोलरक्षक : सनरीक चानू, बिगान सोय, बचावपटू : पिंकी देवी, जसप्रीत कौर, किरण दहिया, संदीप कौर, मनजीत कौर, रितुशा आर्या, रेणुका यादव, मधली फळी : नवजीत कौर (वरिष्ठ), लियु चानू, मनमीत कौर, निक्की प्रधान, आघाडीपटू : पुनम बार्ला, नवनीत कौर, जसविंदर कौर, नेहा गोयल, हरदीप कौर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 2:16 am

Web Title: hockey india names 18 member junior womens team for scotland
टॅग : Hockey
Next Stories
1 ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी विराट कोहलीला नामांकन
2 रॉयल्सचा सॅमसन चॅलेंजर्सवर भारी
3 किंग्ज इलेव्हन रोहित
Just Now!
X