21 January 2019

News Flash

ज्युनिअर हॉकी शिबीरासाठी हॉकी इंडियाकडून ३३ खेळाडूंची घोषणा

बंगळुरुत रंगणार शिबीर

भारतीय ज्युनिअर हॉकी संघाचे संग्रहीत छायाचित्र

बंगळुरु शहरात ७ जानेवारी ते १५ मार्च दरम्यान रंगणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय शिबीरासाठी हॉकी इंडियाने ३३ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. ज्युड फेलिक्स यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बंगळुरुच्या ‘साई’च्या केंद्रात सराव करणार आहे. या संघात काही प्रचलित नावांसह सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.

असा असेल सराव शिबीरासाठी भारताचा ज्युनिअर संघ –

गोलकिपर – पंकज कुमार, तनुज गुलिया, प्रशांत कुमार चौहान, एएस. सेंतामिझ आरसु

बचावफळी – सुमन बेका, हरमनजीत सिंह, मनदीप मोर, मोहम्मद फराझ, प्रिन, प्रताप लाक्रा

मधली फळी – वरिंदर सिंह, सनी मलिक, विशाल अंतिल, यशदीप, विशाल सिंह, विवेक प्रसाद, अक्षय अवस्थी, सुखजीत सिंह, रबीचंद्र सिंह, दिनचंद्र सिंह

आघाडीची फळी – शैलेंद्र लाक्रा, जयप्रकाश पटेल, दिलप्रीत सिंह, मोहम्मद सैफ खान, रोशन कुमार, अभिषेक, शिवम आनंद, राहुल राजभार, मोहम्मद अलिशान, संजय, मणिंदर सिंह, राहुल, आनंद कुमार बारा

First Published on January 6, 2018 4:33 pm

Web Title: hockey india names 33 players for junior mens national camp
टॅग Hockey India