वरिष्ठ गटाची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा २८ मेपासून पुण्यात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत देशातील ३८ संघांमधून अनेक ऑलिम्पिकपटू भाग घेत आहेत. शिवछत्रपती क्रीडानगरी व पिंपरी चिंचवड पॉलिग्रास मैदान या दोन ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेत ६८४ खेळाडू व २२० तांत्रिक अधिकारी भाग घेत आहेत. स्पर्धेतील सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहेत. प्रत्येक गटातील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. संघांची विभागणी पुढीलप्रमाणे-‘अ’ गट- पंजाब, दिल्ली, गुजरात, अरुणाचल, संयुक्त विद्यापीठ संघ. ‘ब’ गट- एअर इंडिया, मध्यप्रदेश, त्रपुरा, छत्तीसगड, पुडुचेरी. ‘क’ गट-कर्नाटक, सेनादल, बिहार, भारतीय क्रीडा प्राधिकरण, गोवा. ‘ड’ गट-महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, हरियाणा, अंदमान व निकोबार, मुंबई. ‘इ’ गट- झारखंड, ओरिसा, हिमाचल प्रदेश, बंगाल, लेखापाल नियंत्रक इलेव्हन. ‘एफ’ गट- रेल्वे, भोपाळ, सशस्त्र सीमा दल, जम्मू-काश्मीर, नामधारी इलेव्हन. ‘जी’ गट- मणिपूर, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, केरळ. ‘एच’ गट-तामिळनाडू, चंडीगढ, आसाम, राजस्थान.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पिंपरी चिंचवड पॉलिग्रास मैदानावर राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी व हाय परफॉर्मन्स विभागाचे संचालक रोलॅन्ट ऑल्तोमास यांच्या हस्ते होणार आहे. कुर्ग स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेतील सामने सकाळ व दुपारच्या सत्रात होणार आहेत.