15 July 2020

News Flash

हॉकी इंडियाकडून खेलरत्न पुरस्कारासाठी राणी रामपालची शिफारस

ध्यानचंद पुरस्कारासाठी तुषार खांडेकर, डॉ.आर.पी.सिंह यांचं नाव

भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी सर्व क्रीडा संघटना आपापल्या खेळाडूंच्या नावाची शिफारस करत आहे. हॉकी इंडियाने भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपालचं खेलरत्न पुरस्कारासाठी नाव सुचवलं आहे. याव्यतिरीक्त हॉकी इंडियाने वंदना कटारिया, मोनिका आणि पुरुष संघातील हरमनप्रीत सिंह या खेळाडूंचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवलं आहे.

राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीत भारतीय महिलांनी अमेरिकेवर निर्णायक सामन्यात मात करत तिकीट मिळवलं होतं. तिच्या याच कामगिरीमुळे हॉकी इंडियाने राणी रामपालचं नाव सुचवल्याचं समजतंय. याव्यतिरीक्त मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी हॉकी इंडियाने माजी दिग्गज डॉ.आर.पी.सिंह आणि तुषार खांडेकर यांच्या नावाची शिफारस केली आहे. तसेच प्रशिक्षक बी.जे.करियप्पा आणि रोमेश पठानिया यांची नाव हॉकी इंडियाने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाठवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 3:34 pm

Web Title: hockey india nominate rani rampla for khel ratna award psd 91
Next Stories
1 …नाहीतर तुम्हीही या समस्येचा भाग आहात, वर्णद्वेषाविरोधात डॅरेन सॅमीचं परखड मत
2 भारत-ऑस्ट्रेलिया दिवस-रात्र कसोटीवर स्मिथ म्हणतो…
3 क्रिकेटमध्येही होतो वर्णद्वेष, ख्रिस गेलचा धक्कादायक आरोप
Just Now!
X