03 June 2020

News Flash

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून मायकेल नॉब्ज यांची हकालपट्टी

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून मायकेल नॉब्ज यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे नॉब्ज यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

| July 9, 2013 05:01 am

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून मायकेल नॉब्ज यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे नॉब्ज यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरिंदर बात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉब्ज हे प्रशिक्षक असताना संघाची कोणतीही प्रगती होत नसल्याने त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यानुसार त्यांना नियमाप्रमाणे महिनाभराआधी प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्यासाठीची नोटीसही पाठविण्यात आली आहे. मागील महिन्यात झालेल्या हॉकी विश्वलीग स्पर्धेमध्येही भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आता रोलंट ओल्टमन्स यांची भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचेही बात्रा यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2013 5:01 am

Web Title: hockey india sack unmotivated michael nobbs 2
Next Stories
1 जडेजा आणि रैनाने मागितली माफी
2 महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिलाषा उत्सुक
3 अखेरची संधी!
Just Now!
X