25 May 2020

News Flash

हॉकी इंडियात पुन्हा वादळ, ओल्टमन्स यांच्या कामगिरीची चौकशी होणार

हॉकी इंडियाकडून चौकशी समितीची स्थापना

रोलंट ओल्टमन्स ( संग्रहीत छायाचित्र )

वर्ल्ड हॉकी लिग स्पर्धेतल्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्यावर कुऱ्हाड पडण्याची शक्यता आहे. ओल्डमन्स यांच्या कारकिर्दीत भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ‘हॉकी इंडिया’ने एका समितीची स्थापना केली आहे. या अहवालावर ओल्टमन्स यांचं भवितव्य ठरणार आहे. संघाचे ‘हाय परफॉर्मन्स डिरेक्टर’ डेव्हिड जॉन हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

आशियाई खंडातील देशांसोबत खेळताना भारतीय संघ हा मैदानात उत्तम खेळ करतो. मात्र युरोपियन संघासमोर भारताची कामगिरी खालावते. आपल्यापेक्षा वरचढ संघाविरुद्ध खेळताना ओल्टमन्स यांच्याकडे पर्यायी योजना नसल्याचं हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात केलेल्या भारतीय संघाने बेल्जियमविरुद्ध खराब खेळ केला होता. सुलतान अझलन शहा आणि वर्ल्ड हॉकी लिगमध्येही मलेशियाने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. यात भरीस भर म्हणून कॅनडानेही भारतावर मात करत भारतीय संघाला मोठा धक्का दिला होता.

मात्र यावेळी हॉकी इंडिया थेट कोणत्याही निर्णयावर पोहचणार नाहीये. माजी प्रशिक्षक पॉल वॅन अस यांच्या राजीनाम्यावेळी हॉकी इंडियाला टीकेची झोड सहन करावी लागली होती. यासाठी वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेत भारताच्या खराब कामगिरीचा आढावा घेण्यात येणार असून, जे खेळाडू सतत खराब कामगिरी करत आहेत, त्यांनाही पुढच्यावेळी संघातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

बऱ्याचवेळा भारतीय खेळाडू ठरवून दिलेल्या योजनेप्रमाणे मैदानात खेळ करत नाहीत. त्यामुळे खेळाडूंकडून काही चुका होत असतील तर त्या सुधारण्यासाठी काय करता येईल, अशा सर्व बाबींचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं हॉकी इंडियाने म्हणलंय. ६ ऑगस्टला भारताचा हॉकी संघ युरोप दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ बेल्जियम आणि नेदरलँडच्या संघाविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यामुळे आगामी काळातही भारतासमोरचं आव्हान खडतरच असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2017 12:57 pm

Web Title: hockey india to inquire team india dismal performance in world hockey league will decide the future of rolent oltmans
टॅग Hockey India
Next Stories
1 ‘हा’ झेल तुम्हाला रिकी पाँटींगची आठवण करुन देईल
2 Ind vs SL 1st Test Updates Day 1 : भारताचा धावसंख्येचा डोंगर, शिखर-चेतेश्वर पुजाराची शतकं
3 वर्चस्वाचा डंका, आता लक्ष्य लंका!
Just Now!
X