नवी दिल्ली : पंजाब सशस्त्र पोलीस दल आणि पंजाब नॅशनल बँक यांच्यातील नेहरू चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत हाणामारी केल्याप्रकरणी ‘हॉकी इंडिया’ संघटनेच्या शिस्तपालन समितीने मंगळवारी ११ खेळाडूंसह दोन पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

गेल्या महिन्यात झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हॉकी स्टिकच्या साहाय्याने  हाणामारी करताना अपशब्दांचाही वापर केला. त्यामुळे ‘हॉकी इंडिया’चे उपाध्यक्ष भाला नाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पंजाब पोलिसांना १२ ते १८ महिने आणि पंजाब बँकेवर ६ ते १२ महिने निलंबनाची कारवाई केली आहे.