20 September 2020

News Flash

सरदार सिंह, देवेंद्र झाजरिया खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

१७ खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव

सरदार सिंह आणि देवेंद्र झाजरियाला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमीत्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेळ दिवसाच्या निमीत्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील निवडक खेळाडूंचा सत्कार केला आहे. हॉकीपटू सरदार सिंह आणि पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झाजरियाचा मानाच्या खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती भवनात आज हा सोहळा पार पडला. याव्यतिरीक्त १७ क्रिडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं.

अवश्य वाचा – Major Dhyanchand Birth Anniversary Special : …तोपर्यंत हॉकीला पुन्हा अच्छे दिन येणार नाहीत!

क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पॅरालिम्पीकपटू मरिअप्पन थंगवेलू, वरुण भाटी, एसएसपी. चौरसिया, साकेथ मायनेई, खुशबीर कौर, आरोक्य राजीव, प्रशांती सिंह, एसव्ही सुनील, सत्यव्रत कादियान, अँथोनी अमालराज, पीएन प्रकाश, ज्योती सुरेखा वेन्नम, जसवीर सिंह, देवेंद्रो सिंह, बेंमबेम देवी या क्रिडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत असल्यामुळे चेतेश्वर पुजारा या सोहळ्याला हजर राहू शकला नाही.

याव्यतिरीक्त विविध क्रिडाप्रकारांमध्ये प्रशिक्षणाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. याव्यतिरीक्त निता अंबानी यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराने गौरवण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 6:22 pm

Web Title: hockey star sardar singh para olympic star devendra jhajariya received khelratna award from president ramnath kovind
टॅग Sardar Singh
Next Stories
1 ध्यानचंद यांच्याविषयी माहिती असायलाच हवी, सेहवागचा ट्विटर ‘स्ट्रोक’
2 सिंधू-सायनासोबत सेल्फी घेण्यासाठी ऑलिम्पिक विजेत्या मरीनची आई रांगेत
3 मालिका विजयाचा आनंद, विराट कोहलीचा शमीच्या मुलीसोबत डान्स
Just Now!
X