03 March 2021

News Flash

हॉकी विश्वचषकासाठी कलिंगा स्टेडियम सज्ज

हॉकीचा विश्वचषक भुवनेश्वरच्या ज्या कलिंगा स्टेडियमवर होणार आहे.

हॉकीचा विश्वचषक भुवनेश्वरच्या ज्या कलिंगा स्टेडियमवर होणार आहे, त्या स्टेडियमच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यात आला असून स्पर्धेला महिना बाकी असतानाच संपूर्ण स्टेडियम सज्ज करण्यात आले आहे. भुवनेश्वर शहरासह संपूर्ण ओडिशातही हॉकी विश्वचषकाचे वातावरण तयार झाले आहे.

भुवनेश्वरमध्ये २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या हॉकीच्या विश्वचषकासाठी जणू संपूर्ण नगरच सजू लागले आहे. काही मोठय़ा मॉल्स, हॉटेल्सवर हॉकी विश्वचषकाच्या चिन्हासह खेळाडूंची मोठमोठी चित्रेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. जगभरातून येणाऱ्या हॉकीप्रेमी नागरिकांसाठी शासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सज्ज करण्यात आलेल्या स्टेडियमची क्षमता १५ हजार प्रेक्षकांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रेक्षकांना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. त्याशिवाय भुवनेश्वरमधील सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन घडवून अधिकाधिक पर्यटकांनादेखील आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भुवनेश्वरमध्ये काही सहाव्या शतकातील मंदिरेदेखील असून ती पाहण्याकडेदेखील जगभरातील पर्यटकांचा ओढा असेल, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. तसेच सायकलद्वारे अन्य काही धार्मिक, आध्यात्मिक स्थळे, प्राचीन मठांचे दर्शन घेता येईल, अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 1:51 am

Web Title: hockey world cup
Next Stories
1 भारताच्या टेनिस दुहेरीत दिविज अव्वल स्थानी
2 अव्वल स्थान पटकावण्याचे जोकोविचचे ध्येय
3 IND vs WI : भारताची दणदणीत विजयाची परंपरा सुरूच, केला ‘हा’ विक्रम
Just Now!
X