ओडीशातील भुवनेश्वर शहरात होणारा हॉकी विश्वचषक अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, स्पेनच्या संघाचे प्रशिक्षक फ्रेड्रीक सोयेज यांनी भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून घोषित केलं. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेला स्पेनचा संघ शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये दाखल झाला. 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर येथील कलिंगा मैदानावर हॉकी विश्वचषकाचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

“माझ्या अंदाजानुसार सहा ते सात देशांमध्ये यंदा चांगली चुरस रंगेल. जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे यंदाच्या विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असतील”, सोयेज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या स्पर्धेसाठी स्पेनचा अ गटात समावेश करण्यात आलेला असून त्यांना रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अर्जेंटिना, न्यूझीलंड, फ्रान्स या संघांचा सामना करायचा आहे.