05 June 2020

News Flash

Mens Hockey World Cup 2018 : सराव सामन्यात भारताची अर्जेंटिनावर मात

5-0 ने उडवला धुव्वा

गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय खेळाडू

28 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघाने जोरदार सराव सुरु केला आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताने 2016 रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा 5-0 ने धुव्वा उडवला. भारताकडून हरमनप्रीत सिंह, ललित उपाध्याय, दिलप्रीत, निलकांत शर्मा आणि हार्दिक सिंह यांनी गोल झळकावले. रविवारी भारत स्पेनविरुद्ध आपला दुसरा सराव सामना खेळणार आहे.

भारताने झळकावलेल्या 5 गोलपैकी पहिला आणि तिसरा गोल हा पेनल्टी कॉर्नरवर झळकावण्यात आला होता, बाकीचे 3 गोल हे मैदानी गोल नोंदवले गेले. भारतीय संघाने केलेल्या अष्टपैलू कामगिरीचं प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी कौतुक केलं. मधल्या काळात भारताने सामन्यावर आपलं नियंत्रण गमावलं होतं, यादरम्यान अर्जेंटिनाने दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. विश्वचषकासारख्या स्पर्धेत अशा चुका करणं भारताला महाग पडू शकतं असंही मत हरेंद्रसिंह यांनी व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2018 3:03 pm

Web Title: hockey world cup india beat argentina 5 0 in warm up
टॅग Hockey India
Next Stories
1 धोनीला निवृत्त हो म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही – शाहीद आफ्रिदी
2 हरमनप्रीत कारस्थानी – मिताली राजच्या मॅनेजरचा आरोप
3 एक-दोन खेळाडूंवर अवलंबून राहणे अयोग्य -रुडी हारतोनो
Just Now!
X