04 August 2020

News Flash

जागतिक हॉकी लीग : भारतीय महिला जपानकडून पराभूत

भारतीय महिला संघाने जागतिक हॉकी लीगमधील पराभवाची मालिका गुरुवारी कायम राखली. त्यांना पाचव्या आणि आठव्या क्रमांकांसाठी झालेल्या लढतीत जपानकडून ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला. जागतिक

| June 21, 2013 04:18 am

भारतीय महिला संघाने जागतिक हॉकी लीगमधील पराभवाची मालिका गुरुवारी कायम राखली. त्यांना पाचव्या आणि आठव्या क्रमांकांसाठी झालेल्या लढतीत जपानकडून ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा वरचढ असलेल्या जपानने अपेक्षेनुसार या लढतीत वर्चस्व गाजविले. पूर्वार्धात त्यांनी २-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्याच मिनिटाला आयुका निशिमुरा हिने संघाचे खाते उघडले तर १८ व्या मिनिटाला शिहो ओत्सुका हिने संघाचा दुसरा गोल केला. उत्तरार्ध सुरू नाही तोच ओत्सुकाने स्वत:चा दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदविला. त्यांचा चौथा गोल युरी नगाई हिने केला. या सामन्यातील पराभवामुळे स्पर्धेत पाचवे किंवा सहावे स्थान मिळविण्याची संधी भारताने गमावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2013 4:18 am

Web Title: hockey world league japan womens hockey team beat india by 4 0
टॅग Hockey
Next Stories
1 सौरव गांगुली आवडता भारतीय कर्णधार – लारा
2 भारतविरुद्ध श्रीलंका उपांत्य फेरी सामन्यावर पावसाचे सावट
3 ‘मी सट्टेबाजांकडून पैसे घेतले होते, पण घाबरुन परत केले’
Just Now!
X