23 September 2020

News Flash

Hong Kong Open Badminton : कश्यप, सात्विक-अश्विनी जोडीची विजयी सलामी

दोनही सामन्यात शेवटचा गेम ठरला निर्णायक

पारुपल्ली कश्यप

Hong Kong Open Badminton – या स्पर्धेत आज भारताच्या पारुपल्ली कश्यपने पुरुष एकेरीमध्ये तर सात्विकसाईराज रेकिरेड्डी-अश्विनी पोनप्पा जोडीने मिश्र दुहेरीमध्ये विजयी सलामी दिली. पारुपल्ली कश्यपने चिनी तैपेईच्या सू जेन हाव याला पात्रता फेरीत पराभूत केले. मंगळवारी झालेल्या या सामन्यात कश्यपने पहिला गेम २१-७ असा जिंकला होता. पण पुढच्या गेममध्ये हावने पुनरागमन केले. त्याने तो गेम १२-२१ असा जिंकला. त्यामुळे तिसरा गेम निर्णायक ठरला. या गेममध्ये खेळ अटीतटीचा झाला. अखेर केवळ ३ गुणांच्या फरकाने कॅश्यपने तिसरा गेम २१-१८ असा जिंकला आणि पुढील फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढील सामना ७व्या मानांकित इंडोनेशियाच्या अँथनी सिनीसुका गिंटिंग याच्याशी होणार आहे.

दुसरीकडे, मिश्र दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विकसाईराज रेकिरेड्डी-अश्विनी पोनप्पा या जोडीनेही चिनी तैपेईच्या जोडीला धूळ चारली. त्यांनी वांग ची-लीन आणि ली चिआ सिन या जोडीला २१-१६, १९-२१, २१-१४ असे पराभूत केले. पहिला गेम भारतीय जोडीने २१-१६ असा जिंकला. दुसरा गेमही भारतीय जोडी जिंकू शकली असती, पण मोक्याच्या क्षणी चिनी तैपेई जोडीने २ गुण मिळवत तो गेम २१-१९ असा जिंकला. पण अखेरच्या गेममध्ये मात्र भारतीय जोडीने अनुभव पणाला लावत गेम सहज जिंकला आणि पुढील फेरीत धडक मारली. त्यांचा पुढचा सामना तैवानच्या ली यांग आणि सू या चिंग या जोडीशी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 5:00 pm

Web Title: hong kong open badminton kashyap satwik ashwini wins opening matches
टॅग Parupalli Kashyap
Next Stories
1 Flashback : आजच्या दिवशीच रोहितने केली होती ‘ती’ वादळी खेळी
2 पाकिस्तान हॉकी संघाला प्रायोजकत्व मिळालं; हॉकी विश्वचषकाचा मार्ग मोकळा
3 ICC ODI Ranking : कोहली-जसप्रीत बुमराहचं अव्वल स्थान कायम
Just Now!
X