07 July 2020

News Flash

“धोनीची तयारी बघण्यासाठी तरी क्रिकेट लवकर सुरू होऊदे”

धोनीच्या खास सहकाऱ्याने व्यक्त केली इच्छा

३) आयपीएलमध्ये किमान १ हजार धावा काढल्याच्या निकषात सर्वोत्तम सरासरी असलेल्या भारतीय फलंदाजांमध्येही धोनीचा नंबर लागतो. महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतांशवेळा धोनी मधल्या फळीत खेळायला येत असल्यामुळे त्याची ही आकडेवारी दाद देण्यासारखी आहे. आयपीएलमध्ये धोनीची सरासरी आहे ४२.२०...

विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी मतं व्यक्त करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. IPL 2020 मध्ये धोनी आपल्या खेळीचा जलवा दाखवेल आणि झोकात टीम इंडियात पुनरागमन करेल अशाही चर्चा रंगल्या. पण दुर्दैवाने करोनामुळे IPL पुढे ढकलण्यात आले.

IPL सध्या लांबणीवर पडत असल्याने धोनी मैदानावर परतण्याऐवजी निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. ट्विटरवर #Dhoni Retires असा एक हॅशटॅगदेखील ट्रेंड झाल्यामुळे निवृत्तीची पुन्हा चर्चांना उधाण आले होते. पण धोनीची पत्नी साक्षी हिने मात्र टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले होते. “(धोनीची निवृत्ती) या सगळ्या निव्वळ अफवा आहेत. लॉकडाउनमुळे सध्या काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. म्हणून असला हॅशटॅग ट्रेंड होतोय. अशा लोकांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यात लक्ष घालावं”, असे साक्षीने ट्विट केले होते.

त्यानंतर आता धोनीचा सहकारी सुरेश रैनादेखील धोनीला पाठिंबा दर्शवला आहे. “यंदा धोनीने IPL साठी खास आणि वेगळी तयारी केली होती. मी त्याच्यासोबत खूप वर्षे चेन्नईसाठी आणि टीम इंडियासाठी खेळलो आहे. त्याची क्रिकेट हंगामाआधीची तयारी कशी असते हे मला चांगलंच माहिती आहे. पण यंदा त्याची तयारी काही वेगळीच होती. मी त्याच्यासोबत CSK च्या सराव सत्रातही होतो. त्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर IPLसुरू व्हावं आणि धोनीची तयारी किती चोख आहे हे सगळ्यांनी पाहावं”, असे रैना म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 1:55 pm

Web Title: hope ipl restarts quickly and everyone can see how well prepared ms dhoni is says suresh raina vjb 91
Next Stories
1 घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान, BCCI ने केलं कौतुक
2 ‘फ्लॉप’ क्रिकेटपटूंच्या यादीत नाव टाकल्याने खेळाडूच्या पत्नीचा संताप
3 “आधी डोळ्यांची तपासणी, मग क्रिकेट”; राज्य संघटनेचा निर्णय
Just Now!
X