12 November 2019

News Flash

गांगुली BCCI चा अध्यक्ष होणार याचा आनंद, पण… – गौतम गंभीर

२३ ऑक्टोबरला होणार गांगुली संदर्भात BCCI च्या सर्वसाधारण सभेत नियुक्तीची अधिकृत घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड होण्याचा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सोमवारी केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता गांगुली BCCI चे अध्यक्षपद भूषवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. २३ ऑक्टोबरला BCCI च्या सर्वसाधारण सभेत नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

हे वाचा – “…तर मग शास्त्री मुर्खांच्या राज्यात जगत आहेत”; गांगुलीची कोपरखळी

बंगाल क्रिकेट संघटनेत सौरव गांगुलीने सर्वोच्च पद भुषवले. त्यावेळी त्याने संघटनेत ज्या प्रकारच्या सुधारणा घडवल्या त्यावरून तो BCCI चा कारभार कसा करेल हे निश्चितच सांगता येऊ शकते. BCCI हे व्यापक आहे. प्रशासकीय कामकाज हाताळण्यातील त्याची सचोटी त्याला तिथे अधिक दाखवावी लागेल. कर्णधार असताना त्याने साऱ्यांना सोबत घेऊन ‘टीम इंडिया’ घडवली. त्यामुळे BCCI चे अध्यक्षपद भुषवतानादेखील तो यशस्वी होणारच, पण त्याला १० महिन्यांपेक्षा अधिक कालावधी मिळायला हवा. नाही तर त्याने केलेल्या सगळ्या सुधारणा वाया जातील”, असे मत गौतम गंभीरने टाइम्स ऑफ इंडियाच्या स्तंभात व्यक्त केले आहे. गांगुलीला मिळणारे अध्यक्षपद हे कुलिंग-ऑफ कालावधीपुरते म्हणजेच १० महिन्यांकरिता असणार आहे. त्यावरून गंभीरने तसे विधान केले.

फोटो गॅलरी : क्रिकेटपटूंच्या पत्नींनी असं साजरं केलं ‘करवा चौथ’चे व्रत

माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याने सौरव गांगुलीच्या BCCI च्या अध्यक्षपदाबाबत एक महत्त्वाचे विधान केले. “भारतीय क्रिकेट सध्या सकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत आहे.भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याची BCCI च्या अध्यक्षपदासाठी निवड होणे ही खरंच कौतुकाची बाब आहे. BCCI चे हे एक स्तुत्य पाऊल आहे. साधारणपणे BCCI ची कार्यपद्धती पाहता ती कार्यप्रणाली अतिशय साचेबद्ध आणि अपारदर्शी होती. पण आता पारदर्शक कार्यप्रणाली राबवून गांगुलीसारख्या क्रिकेटच्या जाणकाराला मंडळातील वरिष्ठ पद देणे हे अतिशय सुखावह आहे. हे कसं झालं मला माहिती नाही आणि मला माहिती करूनही घ्यायचे नाही. भारतीय क्रिकेट समजणाऱ्याला हे पद मिळाले यातच मी समाधानी आहे”, असेही गंभीरने लिहिले आहे.

First Published on October 19, 2019 12:28 pm

Web Title: hope sourav ganguly gets more than 10 months bcci president gautam gambhir vjb 91