News Flash

Video : चहलची होणारी पत्नी धनश्रीचा भन्नाट डान्स

तुम्ही पाहिलात का तिचा खास डान्स?

सध्या IPLचा १३वा हंगाम मोठ्या जल्लोषात खेळला जात आहे. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाचे खेळाडू आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश करत आहेत. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलदेखील आपल्या फिरकी गोलंदाजीने चाहत्यांना आनंदित करताना दिसला आहे. IPL संपवल्यानंतर तो लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा ८ ऑगस्टला संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली होती. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यावेळी धनश्री खूपच चर्चेत होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती तिच्या भन्नाट डान्समुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती तिच्या घराबाहेरच्या आवारात एका उडत्या लयीच्या म्युझिकवर डान्स करताना दिसते आहे. तिच्या या डान्सचं फॅन्सकडून प्रचंड कौतुक केलं जात आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांतील खास पर्वणी (वीकेंड बूम) असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तसंच, या कॅप्शनसोबत तिने ले्टस डान्स हा हॅशटॅग वापरत साऱ्या चाहत्यांनाही डान्स करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या हा व्हिडीओ होणारा नवरदेव युजवेंद्र चहल याने लाइक केला असून त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

 

View this post on Instagram

 

The weekend boom #letsdanceya #abusadamente part 1

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) on

दरम्यान, धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे १.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला होता. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली होती आणि आता तो IPL 2020मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून चांगली कामगिरी करतानाही दिसतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 1:59 pm

Web Title: hot dance video of youtube sensation dhanashree verma who got engaged to team india cricketer yuzvendra chahal musical vjb 91
Next Stories
1 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : हॅलेपची पराभवाची परतफेड
2 ला-लिगा फुटबॉल : फाटीचा पुन्हा गोल; बार्सिलोनाचा विजय
3 ICC Women’s T20I Ranking : भारतीय महिलांची तिसऱ्या स्थानावर झेप
Just Now!
X