News Flash

एक रोमँटिक संध्याकाळ… धनश्री अन् चहलचा ‘हा’ फोटो पाहिलात का?

IPLचा आनंद लुटण्यासाठी धनश्री थेट युएईत

सध्या IPLचा १३वा हंगाम मोठ्या जल्लोषात खेळला जात आहे. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाचे खेळाडू आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश करत आहेत. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलदेखील आपल्या फिरकी गोलंदाजीने चाहत्यांना आनंदित करताना दिसला आहे. IPL संपवल्यानंतर तो यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. पण सध्या मात्र या जोडीचा एक रोमँटिक फोटो चर्चेत आहे.

युजवेंद्र चहलचा ऑगस्ट महिन्यात यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा झाला. त्यानंतर धनश्री आपल्या कामात व्यस्त होती आणि चहल IPLसाठी युएईला रवाना झाला. पण गेल्या आठवड्यात चहलच्या होणाऱ्या पत्नीने थेट दुबईच्या मैदानावरच हजेरी लावली. IPL 2020 च्या सामन्यांसाठी फारच मर्यादित प्रेक्षकांची हजेरी असते. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सामन्यासाठी थेट स्टेडियममध्ये हजर झाली होती. तशीच धनश्रीनेदेखील थेट स्टेडियममध्ये उपस्थिती लावली. त्यानंतर आता या जोडीने युएईमध्ये निसर्गरम्य ठिकाणी काढलेला एक फोटो खास चर्चेत आहे. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

Here’s to my perfect evening

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on

 

View this post on Instagram

 

Few things in life are as beautiful as a setting sun

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) on

चहलने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करून ‘माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य संध्याकाळ’ असं छानसं कॅप्शन दिलं आहे. तर ‘आयुष्यातील काही गोष्टी या सूर्यास्ताच्या रंगाप्रमाणेच सुंदर असतात’, असं कॅप्शन देत धनश्रीने तो फोटो पोस्ट केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 5:45 pm

Web Title: hot romantic couple photo dhanashree verma youtube sensation team india cricketer yuzvendra chahal sunset in uae dubai ipl 2020 vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाचव्या स्थानासाठी शार्दुल ठाकूर-मोहम्मद सिराजमध्ये शर्यत
2 धोनीच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला माजी कर्णधार
3 HBD Veeru: साऱ्यांना हटके विश करणाऱ्या विरूला क्रिकेटपटूंनी ‘अशा’ दिल्या सदिच्छा
Just Now!
X