01 March 2021

News Flash

Video: सोफीने लगावलेला षटकार मैदानाबाहेर बसलेल्या चिमुरडीला लागला अन्…

सोफी डिवायनने जे केलं त्याची सर्वत्र स्तुती करण्यात येत आहे.

न्यूझीलंड संघाची स्टार महिला क्रिकेटपटू सोफी डिवायन ही आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये ओटागो आणि वेलिंग्टन महिला संघात एक सामना खेळण्यात आला. या सामन्यात वेलिंग्टन संघाच्या सोफी डिवायनने आक्रमक फलंदाजी करत ३८ चेंडूत १०८ धावा कुटल्या. तिने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ९ षटकारांची आतषबाजी केली. सोफीने मारलेला एक षटकार थोडासा नकारात्मक कारणामुळे चर्चेत आला.

सोफीने लगावलेला एक षटकार स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका चिमुरीच्या डोक्याला लागला. दुखापत फारशी गंभीर नव्हती परंतु मुलगी अगदीच लहान होती, त्यामुळे तिला होणाऱ्या वेदना जास्त होत्या. सोफीने हा प्रकार पाहिला. महत्त्वाची बाब म्हणजे, सामना संपल्यानंतर सोफीने जे केलं त्या कृत्याची खूपच सकारात्मक चर्चा झाली.

सामना संपल्यानंतर सोफी डिवायन चेंडू लागलेल्या मुलीकडे गेली. तिने अतिशय प्रेमाने त्या चिमुरडीची चौकशी केली. त्यानंतर सोफीने आपली टोपी त्या मुलीला दिली. तसेच त्या छोट्या मुलीसोबत काही फोटो काढले.

या सर्व घटनेचा व्हिडिओ न्यूझीलंड महिला संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून सारेच सोफीची स्तुती करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 5:02 pm

Web Title: hot sexy female cricketer sophie devine gesture towards young fan girl earn praises video goes viral watch vjb 91
Next Stories
1 तेंडुलकर बाप-लेकाच्या नावावर खास विक्रम
2 Video: अजब गजब क्रिकेट! खेळाडूने केली ‘भरतनाट्यम’ गोलंदाजी
3 सचिनचं हटके ट्विट; करोनाविरूद्धच्या लढ्याची केली भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीशी तुलना
Just Now!
X