21 January 2021

News Flash

IPL vs PSL : जाणून घ्या, दोन्ही स्पर्धांमध्ये विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षिसातील फरक

कराचीच्या संघाने मिळवलं PSL चं विजेतेपद

१० नोव्हेंबरला आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना पार पडल्यानंतर ७ दिवसांनी पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत सलग दुसऱ्यांना स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं, तर कराची संघाने आपलं पहिलं PSL विजेतेपद मिळवलं. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे PSL च्या प्ले-ऑफचे सामने स्थगित करण्यात आले होते.

७ दिवसांच्या फरकाने पार पडलेल्या PSL च्या अंतिम सामन्यात विजेत्यांना कितीचं बक्षीस मिळालं हे आज जाणून घेऊयात. जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयलाही करोनाचा फटका बसलेला असला तरीही IPL विजेत्या संघाला मिळालेली रक्कम आणि PSL विजेत्या संघाला मिळालेली रक्कम यात मोठा फरक आहे.

भारतीय चलनानुसार आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाला अंदाजे २० कोटींचं बक्षीस मिळालं तर उप-विजेत्या दिल्ली संघाला १२.५ कोटी मिळाले. तर दुसरीकडे PSL विजेत्या कराची संघाला ३.७५ कोटींचं बक्षीस मिळालं असून उप-विजेत्या लाहोरला १.५ कोटी बक्षिस मिळालं. म्हणजेच ढोबळमानाने अंदाज लावायला गेल्यास पीएसएल विजेत्या संघापेक्षा आयपीएल विजेत्या संघाला जवळपास ५ पट अधिक रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.

आयपीएलमध्ये तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संघालाही बक्षीस मिळतं. यानुसार हैदराबाद आणि बंगळुरु संघाला ८.७५ कोटींचं बक्षिस मिळालं, पण पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेत तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संघांना बक्षीस मिळत नाही. सांघिक बक्षीस रक्कमेत जरी मोठा फरक दिसत असला तरी आयपीएल आणि पीएसएलमध्ये वैयक्तिक बक्षीस रक्कमेत मात्र साम्य आहे. आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, इमर्जिंग प्लेअर यासाठी १० लाखांचं बक्षीस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 4:33 pm

Web Title: how much money psl 2020 winners karachi kings earned compared to ipl 2020 champions mumbai indians psd 91
Next Stories
1 ‘मुंबई इंडियन्स’च्या खेळाडूने जिंकलं पाकिस्तान टी२० स्पर्धेचं विजेतेपद
2 Video: मुलाखत सुरू असतानाच चिमुरडी क्रिकेटपटूच्या मांडीवर येऊन बसली अन्…
3 पुढील हंगामासाठी पंजाबने ख्रिस गेलचा विचार करु नये, आकाश चोप्राचा सल्ला
Just Now!
X