27 September 2020

News Flash

हंगेरीचा ऑस्ट्रियावर धसमुसळा विजय

पहिल्याच मिनिटाला ऑस्ट्रियाच्या डेव्हिड अलाबाने जास्त अंतरावरून गोल करण्याचा प्रयत्न केला.

झोल्टान स्टाइबर

चेंडू आपल्याकडे राखण्यासाठी, पास करण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूंना धक्काबुक्की, मारामारी आणि एकूणच धसमुसळ्या सामन्यात हंगेरीने युरो चषकाच्या सलामीच्या लढतीत ऑस्ट्रियावर २-० असा विजय मिळवला. अ‍ॅडम स्लाय व झोल्टान स्टाइबर या विजयाचे शिल्पकार ठरले.

पहिल्याच मिनिटाला ऑस्ट्रियाच्या डेव्हिड अलाबाने जास्त अंतरावरून गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो गोलपोस्टच्या उजव्या खांबावर जाऊन आदळला. ३३व्या मिनिटाला हंगेरीच्या अलेक्झांडर ड्रॅगोव्हिकने चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात प्रतिस्पर्धी खेळाडूला धक्का मारल्याप्रकरणी त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. ३५व्या मिनिटाला हंगेरीचा गोलरक्षक गाबोर किरालीने ऑस्ट्रियाच्या लाटाको झुन्कोझव्हिकचा गोलचा प्रयत्न रोखला. चाहत्यांनी आवाजी प्रतिसादाने त्याचा उत्साह वाढवला. मार्को अरुनाटोव्हिचा गोलप्रयत्नही गाबोरने अडवला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाचे गोलप्रयत्न अपयशी ठरले होते.

मध्यंतरानंतर ५५व्या मिनिटाला ऑस्ट्रियाच्या रॉबर्ट अल्मेरने बालाझस झयुसडस्कचा प्रयत्न हाणून पाडला. ६२व्या मिनिटाला हंगेरीच्या अ‍ॅडम स्लायने मिळालेल्या सुरेख पासचा वापर करत ऑस्ट्रियाच्या गोलरक्षकाला भेदत गोल केला.  ६६व्या मिनिटाला दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आल्याने ड्रॅगोव्हिकला मैदान सोडावे लागले.

ऑस्ट्रियाच्या रॉबर्ट आल्मेरने हंगेरीच्या आघाडीपटूंना रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ७९व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या झोल्टान स्टाइबरने ८७व्या मिनिटाला शानदार गोल केला. मध्यरेषेच्या पुढे थोडय़ा अंतरावर स्टाइबरकडे चेंडू सोपवण्यात आला. बहुतांशी खेळाडू मागच्या बाजूला राहिल्याने स्टाइबर आणि ऑस्ट्रियाचा गोलरक्षक आल्मेर यांच्यात लढाई होती. मात्र गोलपोस्टच्या जवळ येताच स्टाइबरने क्षणभर थांबत आल्मेरच्या डोक्यावरून चेंडू गोलजाळ्यात धाडला. या गोलसह ऑस्ट्रियाच्या आशा मावळल्या. उर्वरित वेळेत चेंडूवर नियंत्रण राखत हंगेरीने थरारक विजयावर शिक्कामोर्तब केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2016 5:09 am

Web Title: hungry beast australia
Next Stories
1 भारताचा कोरियावर विजय; सुनील आणि थिमय्या यांचे गोल
2 निभ्रेळ यशाचे भारताचे लक्ष्य
3 भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची निवड २४ जूनला
Just Now!
X