चेपॉकच्या खेळपट्टीवर टीका सुरु असताना, रविचंद्रन अश्विनने त्याच खेळपट्टीवर शानदार शतक झळकवून टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. पहिल्या डावात अश्विनने आपल्या फिरकी गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले होते. चेपॉकच्या ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ, इंग्लंडच्या मायकेल वॉघन यांनी टीका केली, त्याच विकेटवर अश्विनने शतक झळकवून दाखवले आहे.

“कसोटीसाठी अशा प्रकारची खेळपट्टी अजिबात मान्य नाही” असे वॉ आणि वॉघन यांनी म्हटले होते. क्रिकेटच्या काही जाणकारांनी खेळपट्टी योग्य असल्याचे मत नोंदवले होते. पण टीका भरपूर सुरु होती. खासकरुन इंग्लंडच्या क्रिकेटपटूंकडून टीका होत होती. चेपॉकच्या खेळपट्टीने पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांना साथ दिली आहे.

VIDEO : … म्हणून अश्विननं मागितली हरभजनची माफी

अश्विनच्या अर्धशतकानंतर त्याची पत्नी प्रिथी अश्विन सुद्धा स्वत:ला रोखू शकली नाही. तिने गंमतीशीर टि्वट करताना चेपॉकच्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना टोला हाणला आहे. ‘माझा नवरा प्रत्येकाला ट्रोल करतोय #win50’ असे तिने टि्वट मध्ये म्हटले आहे.

Ind vs Eng Video: रोहित – पंत यांच्यात मैदानावर राडा? पाहा नक्की काय झालं…

पहिल्या डावात अश्विनने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा लाभ उठवत अश्विनने आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लिश फलंदाजांना चांगलेच नाचवले.