News Flash

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा बीसीसीआयला प्रस्ताव

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनने केले ट्विट

सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (एचसीए) यंदा आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयला प्रस्ताव दिला आहे. एचसीएच्या मते, करोना विषाणूमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) जागा बदलण्याची इच्छा असेल, तर ते राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करण्यास सज्ज आहेत.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनने ट्विट केले, की अशा कठीण काळात आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आयपीएलचे आयोजन सुरळीत व्हावे यासाठी एचसीएने सामन्यांचे आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

 

बीसीसीआयने हैदराबादला आयपीएल 2021चे पर्यायी ठिकाण म्हणून ठेवले आहे. मात्र, बोर्डाकडून यासंबधी कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. करोना रुग्णसंख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध जाहीर केले. या निर्बंधानंतर मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल सामने मुंबईतच खेळवणार असल्याचे स्पष्ट केले. आता महाराष्ट्र सरकारनेही आयपीएलला परवानगी दिली आहे.

आयपीएल 2021 आणि करोना

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर देवदत्त पडिक्कल करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. देवदत्तपूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल करोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. यंदाच्या आयपीएलमध्ये करोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा आणि देवदत्त तिसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला करोनाने ग्रासले होते. मात्र, त्यानंतर तो निगेटिव्ह आढळला. चेन्नई सुपर किंग्जच्या कंटेट टीमच्या सदस्यालाही करोनाची लागण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 5:08 pm

Web Title: hyderabad cricket association offer to host ipl matches adn 96
Next Stories
1 क्या बात..! राजस्थान रॉयल्सची नवीन जर्सी चर्चेत
2 आयपीएलपूर्वी नेट्समध्ये धोनीचा धुमाकूळ…! पाहा व्हिडिओ
3 मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत नवाब मलिक म्हणाले…
Just Now!
X