श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर, आयसीसीकडून भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. यानंतर जयसूर्याने या आरोपांवर आपलं स्षष्टीकरण दिलं आहे. आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत जयसूर्याने, मी आपलं प्रत्येक काम नैतिकतेने आणि पारदर्शक राहून केलं असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर ICCने केले भ्रष्टाचाराचे आरोप

आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कायद्यांचं उल्लंघन केल्याचा ठपका जयसूर्यावर ठेवण्यात आला होता. मात्र आपल्यावर तपासात सहकार्य केल नसल्यामुळे आरोप ठेवण्यात आलेले असून माझा मॅच फिक्सींगच्या कोणत्याही प्रकरणाशी संबंध नसल्याचं जयसूर्याने स्पष्ट केलं आहे. आज जयसूर्याने एक प्रसिद्धीपत्रक काढून आपल्यावरील आरोपांना उत्तर दिलं आहे.

मी आतापर्यंत प्रत्येक काम है नैतिकतेच्या आधारावर केलं आहे, आणि यापुढेही मी असंच काम करत राहीन. माझ्या वकीलांनी या प्रकरणाशी संदर्भात प्रसारमाध्यमांशी जास्त बोलण्याची परवानगी दिली नाहीये. त्यामुळे मी या विषयी फार स्पष्टीकरण देणार नाही, मात्र आपली योग्य बाजू आयसीसीसमोर मांडू असा आत्मविश्वासही जयसूर्याने व्यक्त केला आहे.