News Flash

कर्णधार म्हणून माझ्यामध्ये एमएस धोनीसारखे गुण – रोहित शर्मा

आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य क्रिकेट पंडितांनी रोहित शर्मावर स्तुती सुमने उधळली आहेत.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य क्रिकेट पंडितांनी रोहित शर्मावर स्तुती सुमने उधळली आहेत. अंतिम सामन्यासह संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहितने ज्या पद्धतीने शांत आणि संयमी राहून संघाचे नेतृत्व केले त्याचे रवी शास्त्री यांनी कौतुक केले आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.

सामन्या दरम्यान दडपण, दबावाच्या प्रसंगात शांत राहण्याचा गुण आपण महेंद्रसिंह धोनीकडून आत्मसात केला आहे असे रोहितने सांगितले. इतकी वर्ष मी धोनीला संघाचे नेतृत्व करताना पाहिले आहे. तो निर्णय घेताना कधीही गोंधळला नाही. निर्णय घेताना त्याने वेळ घेतला. माझ्यामध्ये सुद्धा हेच गुण आहेत असे रोहितने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

(Asia Cup 2018 : …तर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम – रोहित शर्मा)

मी सुद्धा आधी विचार करतो नंतर व्यक्त होतो. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला वेळ मिळत असला तरी तुम्हाला निर्णय घेण्यासाठी वेळ लागतोच. आम्ही कित्येकवर्ष धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो आहोत. त्याला पाहूनच मी हे शिकलो. जेव्हा केव्हा गरज असते तेव्हा तो सल्ला देण्यासाठी तयार असतो असे रोहितने सांगितले. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशवर तीन विकेट राखून विजय मिळवून सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.

आशिया चषकाच्या विजयानंतर पत्रकारांनी रोहितला भविष्यात संघाचं पूर्णवेळ नेतृत्व करणार का? असं विचारलं असता, त्यानं नि:संकोचपणे तयारी दाखवली. ‘नक्कीच! जेव्हा-केव्हा तशी संधी मिळेल तेव्हा मी आनंदानं कर्णधारपद स्वीकारेन,’ असं तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 5:22 pm

Web Title: i am a lot like ms dhoni as captain rohit sharma
Next Stories
1 Asia Cup 2018 : …तर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम – रोहित शर्मा
2 हसीन जहाँपासून मला धोका, मोहम्मद शमीने केली सुरक्षारक्षकाची मागणी
3 सायनाच्या बायोपिकमधील श्रद्धाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
Just Now!
X