News Flash

मॅच फिक्सिंग प्रकरण : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या बंदीच्या शिक्षेत घट

निर्णयाने समाधानी नसल्याचं खेळाडूचं मत

पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. मॅच फिक्सिंगप्रकरणी तो दोषी आढळला असून त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर तीन वर्षांच्या क्रिकेटबंदीची कारवाई केली होती. पण अखेर त्याला बुधवारी थोडा दिलासा देण्यात आला. त्याच्यावरील बंदीच्या कालावधीत घट करून शिक्षेचा कालावधी १८ महिने करण्यात आला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २७ एप्रिलला क्रिकेटपटू उमर अकमलला मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरवत त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. अकमलच्या विरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची शिस्तपालन समिती तपास करत होती. त्याच अंतर्गत त्याची चौकशीदेखील केली गेली होती. या तपासाअंती त्याला मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रसिद्धी विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून उमर अकमलवरील कारवाईची माहिती दिली होती.

शिक्षेचा कालावधी कमी केल्यानंतर अकमलने प्रतिक्रिया दिली. “माझ्या वकिलांच्या माध्यमातून माझी बाजू ऐकून घेतल्याबद्दल मी न्यायमूर्तींचे आभार मानतो. माझ्याबाबतीत दिलेल्या निकालाचा मला आदर आहे. परंतु मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेल्या इतरांना खूप सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मी ही शिक्षा शक्य तितकी आणखी कमी करण्याच्या दृष्टीने वकिलांशी सल्लामसलत करणार आहे”, असे त्याने सांगितले.

काय होतं प्रकरण?

अकमलने एका मुलाखतीत असे सांगितले होते की त्याला सामना सुरू असताना दोन वेळा चेंडू जाणूनबुजून सोडण्यासाठी २ लाख अमेरिकन डॉलर्स देण्याचे लालूच दाखवले होते. भारताविरूद्धच्या सामन्यातच त्याला चेंडू सोडण्यास सांगितल्याचेही त्याने मुलाखतीत स्पष्ट केले. २०१५ ला ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्याशी फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. पण त्याने ही बाब बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगितली नव्हती, त्यामुळे त्याला दणका देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:59 pm

Web Title: i am not satisfied says umar akmal reacting on ban reduction to 18 months from 3 years match fixing vjb 91
Next Stories
1 Coronavirus : जागतिक क्रमवारीतील ‘नंबर १’ अ‍ॅशले बार्टीची US Openमधून माघार
2 धोनी की पॉन्टींग? आफ्रिदीने सांगितला आवडता कर्णधार
3 भारतीय गोलंदाजांचेच वर्चस्व!
Just Now!
X