झिम्बाब्वे दौऱयात भारतीय संघाच्या कर्णधाराची जबाबदारी अजिंक्य रहाणे उत्तमरित्या पार पाडेल याची खात्री असल्याचे सांगत माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरने अजिंक्यवर कौतुकाचा वर्षाव केला. अजिंक्यला संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल सचिनने त्याचे अभिनंदन केले.
अजिंक्यला मिळालेल्या संधीचा मला आनंद असून तो अतिशय परिश्रमी खेळाडू आहे. अजिंक्यची क्रिकेटच्या प्रती असलेली वचनबद्धता आणि निष्ठेने मला नेहमी प्रभावित केले आहे. तो नक्की अभिमानास्पद कामगिरी करेल याची खात्री आहे, असे सचिन म्हणाला.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वा खालील भारताचा युवा संघ १० जुलैपासून झिम्बाब्वे दौऱयावर जाणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा सामावेश असणार आहे.