News Flash

खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीतून हरभजन सिंहची माघार

स्वतःच पंजाब सरकारला विनंती केल्याचं हरभजनचं स्पष्टीकरण

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंहचं नाव पंजाब सरकारने खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीमधून मागे घेतलं. यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र यानंतर हरभजन सिंहने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत, आपणच सरकारला नाव मागे घेण्याची विनंती केली होती असं सांगितलं आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही खेळाडूने ३ वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणं हा निकष असतो. हरभजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपलं म्हणणं मांडलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून हरभजन सिंह भारतीय संघात खेळत नाहीये. आयपीएलमध्ये हरभजन चेन्नईचं प्रतिनिधीत्व करत असला तरीही भारतीय संघात पुनरागमन करण्याचं त्याचं स्वप्न अधुरच आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू अशी ओळख असलेल्या हरभजनने आतापर्यंत १०३ कसोटी, २३६ वन-डे सामने खेळले आहेत. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये हरभजनच्या नावावर अनुक्रमे ४१७ आणि २६९ बळी जमा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 10:36 am

Web Title: i asked punjab govt to withdraw my khel ratna nomination says harbhajan singh psd 91
Next Stories
1 कपिल देव यांच्यामुळेच यशस्वी प्रशिक्षक म्हणून घडलो -द्रविड
2 अमिरातीत ‘आयपीएल’साठी दोन आव्हाने
3 गुणवत्तेचाच निकष!
Just Now!
X