इंग्लंडविरोधात भारतीय संघाला कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल. सध्या भारतीय संघ विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया चषक खेळत आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली भारत इंग्लंडमध्ये पराभवाची मालिका खंडीत करेल असे वाटले होते मात्र भारतीय संघाला पराभाचा सामना करावा लागला. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात सुत्रसंचालकाने पाकिस्तानच्या माजी कर्णधारकडून इंग्लंडमधील पराभवाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर युनूस खान म्हणाला, ‘ संघातील लेग स्पिनरमुळे पाकिस्तान संघाचा इंग्लंडमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यासाठी पाकिस्तानकडे लेग स्पिनरचे अस्त्र नेहमीच असते. भारतीय संघातील युवा खेळाडूने यावर माजी क्रिकेटरसोबत चर्चा करायला हवी.’

यावेळी युनूस खानने २००४मधील एक किस्सा सांगितला. ‘२००४ मध्ये फलंदाजीतील काही टिप्स मी राहुल द्रविडकडे मागितल्या होत्या, आणि यामध्ये काही कमीपणा नाही. जर तुम्हाला एखाद्याकडून काही शिकायचे असल्यास निसंकोचपणे विचारायला हवे. मी राहुलला पाच मिनीटांचा वेळ मागिलता होता. त्यावेळी राहुल द्रविड माझ्या खोलीत आला. राहुलला माझ्या खोलीत आलेलं पाहुन मी चकित झालो होतो. राहुलने त्यावेळी मला सर्व टिप्स दिल्या. राहुल द्रविडने मला केलेले मार्गदर्शन मी आंमलात आणले. ज्याचा मला खूप फायदा झाला.’ असे युनूस खान म्हणाला.

या कार्यक्रमात युनूस खानसोबत भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीनही होता. अझहर म्हणाला की, सुनील गावसकरांचे इंग्लंडमधील रेकॉर्ड चांगले आहे. भारतीय संघातील युवा खेळाडूने त्यांच्याकडून शिकायला हवे. भारतीय संघाने ही संधी गमावली आहे.