टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने नोटाबंदीवरुन चांगलीच फटकेबाजी केली आहे. ‘बदल हा एकटा माणूसच घडवत असतो, विवाहित पुरुष फक्त भाजी आणतो किंवा कुत्र्यांना फिरवण्याचे काम करतो’ असे सांगत सेहवागने नरेंद्र मोदींचे समर्थन केले आहे.

मुंबईतील गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या प्रिमियर लीगच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विरेंद्र सेहवाग उपस्थित होता. या सोहळ्यात त्याच्या खास शैलीत विरुने शाब्दिक फटकेबाजी केली. नोटाबंदीवरुन त्याने नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले. या कार्यक्रमात सेहवागने मैदानातील काही मजेदार आठवणींना उजाळा दिला. २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चेन्नईतील कसोटीत सेहवागने त्रिशतक ठोकले होते. माझ्या ३०० धावा झाल्या असताना मला एक गाण आठवत नव्हते. काही केल्या मला गाण्याच्या ओळी आठवत नव्हत्या. इशांत शर्मा त्यावेळी १२ वा खेळाडू होता. मी इशांतला मैदानात बोलावले आणि माझ्या आयपोडमधून त्या गाण्याच्या ओळी बघायला सांगितले. इशांतनेही आयपोडमधून त्या ओळी ऐकून मला सांगितल्या. सर्वांना वाटले की मी इशांतला पाणी आणायला सांगितले. पण मी त्याला ‘तू जाने ना’ गाण्याच्या ओळी आणायला सांगितल्या होत्या असे सेहवागने सांगितले. सेहवागने हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Female Student Death by Suicide
“सॉरी ताई..”, म्हणत १७ वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं, लैंगिक शोषण झाल्याचा आरोप
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
mla anna bansode reaction on former minister vijay shivtare stands against ajit pawar
शिवतारेंनी भूमिका बदलली नाही तर आम्ही महायुतीचा धर्म पाळणार नाहीत- आमदार अण्णा बनसोडे

वैवाहिक जीवनाविषयी विरु म्हणतो, मी फलंदाजीतील नियमाचे वैवाहिक जीवनातही पालन करतो. मी कधीच पंचाशी वाद घालत नाही कारण तो मला कधीही बाद ठरवू शकतो. त्याचप्रमाणे मी माझ्या पत्नीशीही वाद घालत नाही. एकदा पंच तुम्ही काय म्हणालात हे विसरेल. पण तुम्ही काय बोललात हे बायको कधीच विसरत नाही असे त्यांनी सांगितले. विरुच्या या फटकेबाजीने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले ऐवढे मात्र नक्की.

कॉमेंट्री असो की, ट्विटर…आपल्या बोलंदाजीनं सेहवाग नेहमीच धम्माल उडवून देतो. शाब्दिक कोट्या, कोपरखळ्यांनी तो नेहमीच चर्चेत असतो. नोटबंदीनंतरही त्याने अशाच हटक्या अंदाजात ‘कोटी’ केली होती. जे लोक ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करू शकत नाहीत, त्यांना त्या नोटा पाच बँकांमध्ये जमा करता येणे शक्य आहे. त्या बँका आहेत, बँक ऑफ गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा आणि गोदावरी…असे ट्विट सेहवागने केले होते.