26 September 2020

News Flash

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेने मी लयीत आलो -इशांत शर्मा

गेल्या वर्षी पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे मला क्रिकेटला मुकावे लागले होते, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमुळे मी लयीत आलो असून याचा फायदा नक्कीच होईल, असे भारताचा वेगवान

| March 31, 2013 02:22 am

गेल्या वर्षी पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे मला क्रिकेटला मुकावे लागले होते, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमुळे मी लयीत आलो असून याचा फायदा नक्कीच होईल, असे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने सांगितले.
‘‘माझ्या मते मी हळूहळू का होईना, पण लयीत आलो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीने मी आनंदी आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मला चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण अखेरच्या दोन सामन्यांमध्ये मला सूर सापडला. एकंदरीत या कामगिरीने मी समाधानी आहे. याचा फायदा चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी नक्कीच होईल,’’ असे इशांतने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 2:22 am

Web Title: i came in the rhythm against australia series ishan sharma
टॅग Sports
Next Stories
1 मुंबईचे आव्हान संपुष्टात!
2 रायडर कोमातून बाहेर; पण हल्ल्यासंदर्भात विस्मरण
3 मुंबई शहर तालीम संघ रस्त्यावर!
Just Now!
X