करोना विषाणूमुळे देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही या काळात घरी राहून आपल्या परिवारासोबत वेळ घाववत आहेत. नेहमी मैदानावर आपल्या सहकाऱ्यांसोबत असणारे खेळाडू आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून गप्पा मारताना दिसत आहेत. सलामीवीर रोहित शर्मा आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलने नुकत्यात इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या.

अवश्य वाचा – Video : एक वर्ष झालं नाही क्रिकेट खेळून आणि मला आव्हान देतोय ! ऋषभ पंत रोहितकडून ट्रोल

यावेळी चहलने रोहित शर्माला लॉकडाऊनच्या काळात सतत घरातच असल्यामुळे, पुल शॉटसाठी लागणारी ताकद शिल्लक आहे की कमी झाली असा खोचक प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रोहित शर्माने मी झोपेतून उठूनही पुल शॉट खेळू शकतो असं आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं.

अवश्य वाचा – इंग्रजीतून बोलायला सांगणाऱ्या चाहत्याला रोहितचं सडेतोड उत्तर, म्हणाला..

२९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशात करोनामुळे सध्याची परिस्थिती पाहता १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. दरम्यान बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कार्यकाळात आयपीएल खेळवण्याचा विचार आहे. मात्र यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.