देशभरात आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आपलं जीवन घडवणाऱ्या गुरुंच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आजच्या दिवशी आपले गुरु आचरेकर सरांची भेट घेतली आहे. आपल्या भेटीचे फोटो सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी इतका मोठा पल्ला गाठूच शकलो नसतो, अशा आशयाचं ट्विट करत सचिनने आपल्या चाहत्यांनाही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सचिनचा मित्र अतुल रानाडेही उपस्थित होता.