News Flash

Ind vs NZ : ‘त्या’ भन्नाट कॅचवर रविंद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

जाडेजाने घेतलेला कॅच सोशल मीडियावर व्हायरल

सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तळातल्या फलंदाजांनी हैराण केलं. भारतीय संघाने दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात न्यूझीलंडने ५ गडी झटपट गमावले. भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. मात्र तळातल्या फळीतील कॉलिन डी-ग्रँडहोम, कायल जेमिसन आणि निल वँगर या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरामुळे न्यूझीलंडने भारताला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपल्यामुळे, भारताला अवघ्या ७ धावांची आघाडी मिळाली. जेमिसनने फटकेबाजी करत ४९ धावा केल्या.

निल वँगर आणि कायल जेमिसन जोडीने नवव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे यजमानांनी सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. अखेरीस मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीवर वँगरला माघारी धाडत न्यूझीलंडची ही जोडी फोडली. सीमारेषेवर रविंद्र जाडेजाने हवेत उडी मारत एका हातात भन्नाट झेल टिपला. जाडेजाचा हा झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जाडेजाने या कॅचवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

अवश्य वाचा – Video : रविंद्र जाडेजाचा हा भन्नाट झेल पाहिलात का?

“वँगर डीप स्क्वेअर लेग भागात फटकेबाजी करुन धावा काढणार याचा मला अंदाज होता. पण ज्या जागेवर मी उभा होतो तिकडे चेंडू येईल असं मला वाटलं नव्हतं. त्यावेळी मैदानात वारा वाहत असल्यामुळे चेंडू इतक्या वेगाने आला की मी फक्त माझा हात त्यामध्ये टाकला. तो झेल घेतल्यानंतर मलाही समजलं नाही…आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.” जाडेजानेही या सामन्यात पहिल्या डावात २ बळी घेतले. दरम्यान दुसऱ्या डावात भारतीय संघाची पुन्हा एकदा दाणादाण उडाली. १२४ धावांत भारताचा दुसरा डाव संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान देण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 5:11 am

Web Title: i didnt even realise when i took the catch says ravindra jadeja on neil wagners dismissal psd 91
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 टीम इंडियावर व्हाईटवॉशची नामुष्की; न्यूझीलंड ७ गडी राखत विजयी
2 महिला कॅरमपटूंना अधिक पाठिंबा देण्याची आवश्यकता!
3 ‘मुंबई-श्री’शरीरसौष्ठव स्पर्धा : रसेल दिब्रिटो ‘मुंबई-श्री’
Just Now!
X